भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरला जास्त मागणी आहे.
पण इलेक्ट्रिक कारही हळूहळू लोकप्रिय होत आहेत. सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त आहे.
परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये लवकरच अनेक EV लाँच केले जाऊ शकतात.
परंतु जर तुम्ही परवडणारी इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 3 आगामी इलेक्ट्रिक कारबद्दल सांगत आहोत
यामध्ये Tata Tiago EV, MG ची परवडणारी इलेक्ट्रिक कार आणि Citroen C3 ची इलेक्ट्रिफाइड व्हर्जन समाविष्ट आहे.
Tata Tiago EV : Tata Motors आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV (Tiago EV) 28 सप्टेंबर 2022 रोजी भारतात सादर करेल.
Tata Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत लॉन्च झाल्यावर सुमारे 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
MG Motor India ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ती 2023 च्या पहिल्या सहामाहीत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. याची किंमत 10 लाख ते 15 लाख असू शकते.
Citroen India 2023 च्या पहिल्या तिमाहीत C3 subcompact SUV ची इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करेल. कारची किंमत एक्स-शोरूम 10 लाख ते 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.