Red Section Separator

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. यांची मागणी गेल्या काही दिवसांमधये मोठी वाढली आहे.

Cream Section Separator

यातच आता इलेक्ट्रिक सायकल देखील येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे सायकल ही बाइक आणि स्कूटरच्या तुलनेत स्वस्तदेखील आहे.

दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक सायकलच्या खरेदीवर ३३ टक्के सबसिडी (अनुदान) जाहीर केली आहे.

जर तुम्ही दिल्लीत राहात असाल आणि तुम्हाला इलेक्ट्रिक सायकल घ्यायची असेल, तर तुम्ही १५,००० रुपयांपर्यंतची सबसिडी मिळवू शकता.

दिल्लीत पॅसेंजर इलेक्ट्रिकच्या किमतीवर २५ टक्के आणि कार्गो इलेक्ट्रिक सायकलच्या किमतीवर ३३ टक्के सबसिडी मिळू शकते.

म्हणजेच साधारण ४५,००० रुपयांची सायकल ग्राहक ३०,००० रुपयांत खरेदी करू शकतील. कार्गो ई-सायकलवर जास्तीत जास्त ५,५०० रुपये सबसिडी दिली जात आहे.

विशेष म्हणजे पहिल्या १००० खरेदीदारांना ई-सायकलवर २,००० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल.

Red Section Separator

इलेक्ट्रिक सायकल डीलर्स किंवा OEM ग्राहकाच्या वतीने प्रोत्साहनासाठी अर्ज केला जाईल. हा अर्ज ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे केला जाईल आणि ७ दिवसांत सबसिडी खरेदीदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Red Section Separator

ही सबसिडी केवळ वैयक्तिक लाभार्थी तसेच अधिकृत जीएसटी नोंदणी असलेल्या व्यवसायांनादेखील मिळेल.