Red Section Separator

सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून यातच स्वस्त आणि मस्त अशा एका इलेक्ट्रिक स्कुटर बाबत आम्ही तुम्हला माहिती देणार आहोत.

Cream Section Separator

iVOOMi कंपनीचा इलेक्ट्रिक वाहन (EV) विभाग iVOOMi एनर्जीने अलिकडेच दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केल्या आहेत.

Red Section Separator

ज्यामध्ये कंपनीच्या iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणि Jeet सीरीजमधील इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे.

iVOOMi एनर्जीने अलीकडेच त्यांची S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात ८४,९९९ रुपये (एक्स-शोरूम)इतक्या किमतीत सादर केली आहे.

Red Section Separator

ग्राहक ७४९ रुपयांची टोकन अमाऊंट भरून ही स्कूटर बुक करू शकतील. याशिवाय, iVOOMi S1 ई-स्कूटरची टेस्ट राईड २८ मे २०२२ पासून सुरू होणार आहे.

iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर 2kWh लिथियम-आयन बॅटरी आणि 60V इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज आहे. ही स्कूटर ६५ किमी प्रतितास इतक्या वेगाने धावते.

तसेच ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ११५ किमीपर्यंतची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

Red Section Separator

या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. या स्कूटरचं वजन ७५ किलो इतकं आहे.