Red Section Separator

पावसाळ्यात डोळ्यांचे आजार पसरू नयेत यासाठी काळजी घेणे महत्वाचे असते.

Cream Section Separator

डोळ्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा

तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर करू नका.

डोळ्यांना स्पर्श करू नका अथवा चोळू नका, कारण तुमच्या हातावर हजारो जीवाणू असतात, जे हाताच्या माध्यमातून तुमच्या डोळ्याला संसर्ग करू शकतात.

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

शक्य असल्यास या काळात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे. कारण त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो

डोळ्यांचा मेकअप टाळावा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरू शकतो.

डोळ्यांची नियमित काळजी घेण्यासाठी डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे.

डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन शेअर करू नयेत. डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये