आपल्या शरीराचा 65 ते 70 टक्के भाग या द्रवाने बनलेला असतो, म्हणूनच आपल्याला ‘पाणी हे जीवन आहे’ असे सांगितले जाते.
जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आपला मेंदू आपल्याला पाणी पिण्याचे संकेत देतो.
परंतु काही लोकांना अचानक जास्त तहान लागते. जर तुम्हालाही अशी तक्रार असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
जास्त तहान लागल्याने हे आजार होऊ शकतात. त्याविषयी आपण जाणून घेऊ.
मधुमेह: मधुमेहाच्या स्थितीत रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, जे किडनी सहज फिल्टर करू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि वारंवार तहान लागते.
अपचन:जटिल अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते आणि मग आपल्याला सामान्यपेक्षा जास्त तहान लागते.
चिंता: चिंतेमुळे आपण अस्वस्थत होतो व तोंड कोरडे पडू लागते आणि नंतर व्यक्तीला जास्त पाणी पिण्याची गरज असते.
जास्त घाम येणे:उन्हाळ्यात जास्त घाम येणे सामान्य गोष्ट आहे, परंतु जेव्हा हिवाळ्यात किंवा सामान्य हवामानात असे घडते तेव्हा ते शरीरातील अनेक रोगांचे लक्षण असू शकते.