हिना खान : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने Hacked चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण हिनाला जेवढी प्रसिद्धी टीव्हीवरून मिळाली तेवढी बॉलीवूडमधून मिळाली नाही.
रुपाली गांगुली : रुपाली गांगुलीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिला ओळख फक्त टीव्ही मालिकांमधूनच मिळाली.
अंकिता लोखंडे : अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली आणि त्यानंतर मणिकर्णिका आणि बागी 3 या बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली, परंतु तिला बॉलिवूडमध्ये ती प्रसिद्धी मिळाली नाही.
अनिता हसनदानी : अनिता हसनंदानी यांनी तिच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्यांचे चित्रपट यशस्वी झाले नाहीत.
आमना शरीफ : आमना शरीफने आलू चाटमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर आमना व्हिलन या चित्रपटातही दिसली होती, मात्र सर्व प्रयत्नांनंतरही आमना बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकली नाही.
शनाया इराणी : शनाया इराणीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. फना आणि घोस्ट हे शनायाचे प्रमुख चित्रपट आहेत, पण टीव्हीच्या तुलनेत तिचे बॉलिवूडमध्ये विशेष करिअर झाले नाही.
कृतिका कामरा : टीव्ही अभिनेत्री कृतिकाने मित्रां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, पण कृतिकाचे नाणे बॉलिवूडमध्ये चालले नाही.
श्वेता तिवारी : श्वेताने माधोशी आणि अबरा का डबरा यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र, टीव्हीसारखी लोकप्रियता बॉलिवूडमध्ये मिळू शकली नाही.