भारतातील स्वयंपाकघरात मशरूमची मागणी झपाट्याने वाढत आहे.
आता बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच मशरूमच्या लागवडीकडे वळत आहेत.
जगात मशरूमच्या 2000 पेक्षा जास्त जाती आढळल्या तरी भारतात काही जातीच्या मशरूमचा वापर सर्वाधिक आहे.
यामध्ये व्हाईट बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, मिल्की मशरूम, क्रेमिनी मशरूम, शिताके मशरूम आणि पोर्टोबेलो मशरूम हे सर्वात प्रसिद्ध आहेत.
व्हाईट बटन मशरूम :– या मशरूमला बाजारात मोठी मागणी असते. यामुळे या मशरूमची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे.
ऑयस्टर मशरूम :- मध्य प्रदेश, बंगाल, ओरिसा, कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकरी या मशरूमची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. आपल्या महाराष्ट्रात देखील या मशरूमची शेती केली जात आहे.
मिल्की मशरूम :- मिल्की मशरूमला समर मशरूम देखील म्हणतात. मिल्की मशरूम देखील बटन मशरूम सारखेच दिसते, बाजारात त्याची मागणी कायम आहे.
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशातील शेतकरी इतर पिकांसह दुधाळ मशरूमची लागवड करतात.