Red Section Separator

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवणार आहे.

Cream Section Separator

'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' असे त्याचे शीर्षक आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

हा चित्रपट पुढील वर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार आहे.

विनोद भानुशाली, संदीप सिंग, सॅम खान, कमलेश भानुशाली आणि विशाल गुरनानी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हा चित्रपट NP च्या अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स या पुस्तकावर आधारित आहे.

हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.