Red Section Separator

आपल्या बोल्डनेसमुळे स्वरा भास्कर ही अभिनेत्री नेहमी चर्चेत असते.

Cream Section Separator

स्वरा भास्करनं नुकताच दिग्दर्शक मनीष किशोर आणि मधुकर वर्मा यांचा ‘मिसेस फलानी’ हा चित्रपट साईन केला आहे.

स्वरानं अनेक महिलाकेंद्रित चित्रपट केले असून मिसेस फलानी हादेखील स्त्रीप्रधान चित्रपट असणार आहे.

स्वरानं अनेक महिलाकेंद्रित चित्रपट केले असून मिसेस फलानी हादेखील स्त्रीप्रधान चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष किशोर यांनी सांगितलं, की ‘या चित्रपटाची गोष्ट ऐकताच क्षणी स्वरानं चित्रपटासाठी होकार दिला.

स्वराला चित्रपटाची गोष्ट खूप आवडली. यात नऊ वेगळ्या गोष्टी आहेत, ज्यात स्वराच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

यातील प्रत्येक भूमिका ही वेगळी असणार आहे ही या चित्रपटाची विशेष बाब आहे.’

‘मिसेस फलानी’ची गोष्ट ही छोट्या शहरांमधील प्रत्येक स्त्रीच्या अव्यक्त इच्छांबद्दल भाष्य करते.

कुठे ३५-४० वयोगटातील स्त्री तर कुठे १०-१२ वर्षांच्या मुलांच्या आईची भूमिकाही स्वरा निभावताना दिसणार आहे.

‘चित्रपटात स्त्रीच्या अव्यक्त इच्छा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करताना होणारी कोंडी सुंदर पद्धतीने सादर करण्यात आली आहे.