Red Section Separator

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

Cream Section Separator

दिलासादायक बाब म्हणजे नव्या दरानुसार आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Red Section Separator

आज सलग पाचव्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं.

Red Section Separator

त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे.

दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

Red Section Separator

कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.