Red Section Separator

एकीकडे टॉलिवूडच्या सिनेमांनी विक्रमी उच्चांक गाठला तर दुसरीकडं काही बिग बजेट बॉलिवूड सिनेमा जोरदार आपटले.

Cream Section Separator

नेमके कोणते आहेत 'हे' बॉलिवूड सिनेमे ते आपण जाणून घेऊ

अटॅक - जॉन अब्रामहचा 70 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं केवळ 20 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं.

जर्सी - 22 एप्रिलला शाहिदचा जर्सी प्रदर्शित झाला. तो 35 ते 40 कोटींत तयार झाला. त्यानं 27.9 कोटींची कमाई केली.

बच्चन पांडे - अक्षय कुमारचा हा सिनेमा 180 कोटी रुपयांमध्ये तयार झाला व त्याने केवळ 68.61 कोटी रुपयांची कमाई केली.

हिरोपंती 2 - टायगर श्रॉफच्या हिरोपंती 2 ला प्रेक्षकांनी नापसंत केले. 170 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं फक्त 29 कोटी रुपयांची कमाई केली.

रन वे 34 - अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या रनवे 34 हा सिनेमा 65 कोटींमध्ये तयार झाला व त्याने 47.65 कोटींची कमाई केली.

धाकड - 95 कोटींमध्ये तयार झालेल्या कंगनाची या चित्रपटानं केवळ पावणे चार कोटींची कमाई केली.

झुंड - नागराज मंजुळे यांनी झुंडच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र हा सिनेमा जोरदार आपटला.

सम्राट पृथ्वीराज -  तीनशे कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं शंभर कोटींचा आकडाही पार केला नाही. .