Red Section Separator

प्रत्येक गोष्टीसाठी आज स्मार्टफोनचा वापर होत आहे. स्मार्टफोन हा आता माणसाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक बनला आहे.

Cream Section Separator

मात्र यदाकदाचित तुमचा हा स्मार्टफोन हरवला अथवा चोरीस गेला तर कसा मिळवायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला https://ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटवर जावे लागेल.

या वेबसाइटवर साइन करा. यानंतर तुम्हाला तीन पर्यायांपैकी एक Block Stolen / Lost Mobile असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे मोबाइन नंबर, IMEI नंबर, FIR आणि मोबाइल बिल यासारखी माहिती द्यावी लागेल.

यानंतर जेथे फोन हरवला अथवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, जिल्हा, राज्य, पोलीस स्टेशन, एफआयआर नंबर आणि फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल.

आता तुमचे नाव आणि पत्ता टाका. यानंतर आधार कार्ड अपलोड करून सबमिट करा.

तक्रार केल्यानंतर तुमच्या चोरी झालेल्या फोनचा शोध सुरू होईल. फोनला ट्रेस केले जाईल.

तुमच्या फोनची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल सूचित केले जाईल.