Red Section Separator

सलमान खान 'मैने प्यार किया' या सिनेमापासूनच स्टार झाला होता. त्याच्यावर अनेक मुली अक्षरश: जीव ओवाळून टाकत असायच्या.

Cream Section Separator

या चित्रपटात भाग्यश्रीसोबत सलमानची जोडी चांगलीच हीट झाली होती. भाग्यश्रीचे नंतर लग्न झाले पण सलमान अजूनही अविवाहित आहे.

सलमानने एकदा भाग्यश्रीला सांगितले होते की, चांगल्या मुलींनी त्याला डेट करावे असे वाटत नाही.

याविषयी विचारले असता सलमान म्हणाला - मला वाटत नाही की मी चांगला माणूस आहे.

भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार, सलमानने त्यावेळी मान्य केले होते की तो एकाच जोडीदारासोबत जास्त काळ राहू शकत नाही.

सलमान म्हणाला होता की, त्याला खूप लवकर कंटाळा येतो, जोपर्यंत तो त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तोपर्यंत मुलींनी त्याच्यापासून दूरच राहावे.

सलमानने सोमी अलीपासून ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी आणि कतरिना कैफला डेट केले आहे.

या सगळ्या जणींनी लग्न केलं पण सलमानने मात्र आतापर्यंत लग्न केलेलं नाही.

सलमानचे नाव अनेक दिवसांपासून यूलिया वंतूरसोबत जोडले जात आहे. सलमान आणि यूलिया अनेकदा एकत्रही दिसतात.