Red Section Separator
दुपारी जेवल्यानंतर मस्त ताणून देण्याची सवय अनेकांना असते.
Cream Section Separator
याउलट, दुपारच्या झोपेमुळे दुष्परिणाम होत असल्याचं अनेकांचं मत असतं.
मग दुपारी जेवल्यानंतर झोपावं की झोपू नये, असा प्रश्न पडू शकतो.
या प्रश्नाचं उत्तर काही अटींसह होकारार्थी आहे.
दुपारी जेवणानंतरच्या वामकुक्षी ही संकल्पना पूर्वीपासून प्रचलित आहे.
वामकुक्षी घेणं चांगलं; मात्र त्याचे नियम पाळणं गरजेचं असतं.
दुपारी जेवल्यानंतर लगेच डाव्या कुशीवर आडवं पडून 10 ते 30 मिनिटांपर्यंतच झोपणं उपयुक्त. हा कालावधी दुपारी 1 ते 3 या वेळेतलाच असावा.
लहान मुलं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्तींनी 90 मिनिटांपर्यंत वामकुक्षी घेतली तरी चालते; मात्र संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत अजिबात झोपू नये.
वामकुक्षीच्या वेळेत आडवं पडून टीव्ही, फोन पाहणं टाळावं. जेवल्यानंतर चहा, कॉफी, सिगारेट, चॉकलेट्स या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
वामकुक्षीमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. हृदयविकार, हाय बीपी असलेल्यांना वामकुक्षी फायद्याची ठरते.