Red Section Separator
आम्ही तुम्हाला बेसन वापरण्याऐवजी बेसनाचे फेशियल कसे वापरायचे ते सांगतो.
Cream Section Separator
बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो.
White Line
बेसन क्लिंजर : फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बेसनच्या क्लिन्जरने चुटकीसरशी त्वचा स्वच्छ करू शकता.
यासाठी 1 चमचा बेसनमध्ये 1 चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा.
बेसन टोनर : चेहरा टोन करणे ही फेशियलची दुसरी स्टेप आहे. बेसन टोनर त्वचेची आर्द्रता राखण्यासाठी उपयुक्त आहे.
1 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडे गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता ती चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.
बेसन स्क्रबर : बेसन स्क्रबर त्वचेच्या मृत पेशी काढून चेहरा एक्सफोलिएट करण्याचे काम करते.
यासाठी 2 चमचे बेसनामध्ये 1 चमचे ओट्स, 2 चमचे कॉर्न फ्लोअर आणि 1 चमचे कच्चे दूध घालून पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार पद्धतीनं स्क्रब करा आणि नंतर 5 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
बेसन फेस पॅक : बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचे बेसनामध्ये 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा क्रीम मिसळून पेस्ट बनवा.
आता ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.