Red Section Separator

अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते.

Cream Section Separator

कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ होते, असे म्हटले जाते. तसंच कोंडा कमी होऊन केसगळतीही दूर होते.

कोरडे तसंच निर्जीव केस, केसांमध्ये खाज सुटणे इत्यादी समस्या दह्यामुळे कमी होऊ शकतात.

दही हेअर मास्कमुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते आणि टाळूच्या त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

केस लवकर तुटतात आणि केस पातळ असल्यास अंडी आणि बिअरचा मास्क लावा.

केसांना अंडी लावल्याने केस चमकदार आणि सुंदर होतात. अंड्यांसोबत बिअर वापरल्याने कोंडा दूर होतो आणि केस मजबूत होतात.

केस दाट होण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त ठरते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना कोमट केलेले खोबरेल तेल लावावे

रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल केसांच्या मुळांना लावून हलका मसाज करावा आणि उठल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे केस धुवावेत.

कोरफड हे त्वचेसाठी खूप चांगले आहे. केसांसाठी देखील  तितकेच फायदेशीर आहे . कोरफड जेलने दररोज केसांशी मालिश केल्यास केस  सुंदर आणि चमकदार बनतात.