खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीं तसेच अनियमित जीवनशैली या कारणांमुळे बहुतेक लोकांना दररोज पोट किंवा पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी ‘आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
निरोगी राहिचे असेल तर भरपूर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल आणि तुमचे पोटही निरोगी राहील.
आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते, जे आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आहारात सकस पदार्थांचा समावेश करा. आपण आहारात ऑलिव्ह ऑईल, अंडी, नट्स, एवोकॅडो, पालेभाज्य, फळे आणि फिश इत्यादींचा समावेश करू शकता.
जेवण करताना नेहमीच अन्न चांगले चावून खाल्ले पाहिजे. तसेच दरवेळी जेवताना ताणे अन्न खा. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न परत परत गरम करून खाऊ नका.
नियमित व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे दररोज सकाळी व्यायाम करा. तसेच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 30 मिनिटे चाला.
जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या किंवा खराब पचन दीर्घकाळापासून होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.