Red Section Separator

आजकाल मुरुमांच्या समस्येने अनेकांना ग्रासले आहे. यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते.

Cream Section Separator

तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर आम्ही तुम्हाला काही स्किन केअर टिप्स सांगणार आहोत.

या टिप्सच्या साहाय्याने तुम्ही मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

चेहऱ्यावर पिंपल्स फोडू नये, मुरुम फोडल्याने, जळजळ, खाज सुटते. तसेच, ते डाग देखील सोडू शकतात. त्यामुळे ते फोडणे टाळा.

तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास पुरेसे पाणी पिण्यास सुरुवात करा.

शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर निघतील. यासोबतच चेहऱ्यावर ग्लोही दिसेल.

बहुतेक लोक वर्कआउट केल्यानंतर चेहरा साफ करत नाहीत, मात्र वर्कआऊटनंतर चेहरा स्वच्छ करावा.

चेहऱ्यावरचा घाम पुसला गेला पाहिजे. यासाठी मऊ टॉवेल घेऊन चेहऱ्यावरचा घाम पुसा.

मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी चेहऱ्याची स्वच्छता देखील खूप महत्त्वाची आहे, यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा धुवा.

तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि झोपेच्या वेळी चेहरा धुवू शकता. रात्री झोपताना चेहरा जरूर धुवा, यामुळे दिवसभरातील घाण निघून जाते.