Red Section Separator
फळं, भाजीपाला, मोड आलेली कडधान्यं किंवा दुग्धजन्य पदार्थ यांचा दररोजच्या आहारात समावेश असायलाच हवा.
Cream Section Separator
यातून शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात.
डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ तर बरेचदा अंडी खाण्यास तसंच मांसाहार करण्याचा सल्ला देत असतात.
आरोग्यासाठी तर अंडी अनेक प्रकारे उपयुक्त ठरू शकतात.
परंतु, अंड्यातील पिवळं बलक खावं की नाही? हा प्रश्न नेहमी सर्वांना पडत असतो.
पण ते बलकच सुपरफूड असल्याचं आरोग्य विश्लेषक सांगत असतात.
दिवसभरात तळलेलं किंवा उकडलेलं एक अंड शरीराला 13 विविध प्रकारचे आवश्यक व्हिटॅमिन आणि पोषक तत्त्वं देत असतं.
अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कॉलेस्टेरॉल, चरबी आणि सोडियमचं प्रमाण अधिक असल्याने ते न खाण्याचा प्रयत्न असतो.
पण एखादी व्यक्ती पोषक आहार घेत असेल आणि नियमित व्यायाम करत असेल तर कोलेस्टेरॉल आणि चरबीचं प्रमाण याची काळजी करण्याची आवश्यकता नाही.
अंड्यातील पांढऱ्या भागाच्या तुलनेत पिवळ्या बलकामध्ये अधिक पोषक घटक असतात.
एक अंड व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि 6 वेगवेगळ्या प्रकारच्या बी व्हिटॅमिनने परिपूर्ण असतं.
सूर्यप्रकाशासह अंड्यातील पिवळा बलकही व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठीही मदत करतं.