Red Section Separator

उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरावर खाज येण्याची समस्या वाढते. तसेच उन्हाळ्यात घामोळ्या येतात ज्यामुळे खूप खाज सुटते.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सुचवणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुम्ही या समस्येपासून बचावताल.

कोरपडीचा गर – खाज सुटणाऱ्या ठिकाणी एलोवेरा जेल लावल्याने खाज सुटणे कमी होते.

मोहरी आणि तीळ तेल – अंगाला मोहरी आणि तीळ तेलाने मालिश करून आंघोळ करावी. या घरगुती उपायाने अंगाला खाज सुटणे कमी होते.

खोबरेल तेल – खोबरेल तेलात कापूर मिसळावे व त्या तेलाने मसाज केल्यास खाज सुटणे थांबते.

तुळशीची पाने – तुळशीची पाने बारीक करून ती खाज सुटणाऱ्या भागावर चोळावी या उपायाने खाज सुटणे कमी होते.

लिंबाचा रस - लिंबाच्या रसामध्ये जैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते. तुम्ही लिंबाचा रस थोड्याशा पाण्यात मिसळून खाज सुटलेल्या भागावर लावा. असे केल्यास तुम्हाला खूप आराम मिळेल.

Red Section Separator

बर्फाने शेकवा - जर तुम्हाला खाज येण्याची समस्या खूप त्रास देत असेल, तर तुम्ही सुती कपड्यात बर्फाचे तुकडे टाकून त्याद्वारे खाज येत असलेल्या जागेला शेकवू शकता.