महिला आणि पुरुषांच्या शरीर रचनेत जसा बदल आहे तसेच त्यांच्या दोघांच्या आजाराच्या धोक्यातही तफावत असते.
असे काही आजार आहे ज्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांना या आजारांचा जास्त धोका असतो. ते आपण जाणून घेऊ...
तणाव आणि नैराश्य : महिला या भावनिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं नेहमी मानलं जातं. परंतु तणाव आणि नैराश्याची समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळते.
हृदयविकाराचा आजार : हृदयाशी संबंधित बहुतेक आजारांचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त असतो, कारण पुरुषांना कॉलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीचा जास्त त्रास होतो, त्यामुळे पुरुषांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
मधुमेहाचा विकार : स्त्रियांच्या तुलनेत पुरुष बहुतेक बाहेरील तेलकट पदार्थ खातात, त्यामुळे त्यांच्यातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढून त्यांना मधुमेहाच्या आजाराला सामोरं जावं लागतं.
यकृताचे आजार : महिलांच्या तुलनेत पुरुषांना दारू पिण्याची सवय अधिक असते. त्यामुळं त्यांना महिलांच्या तुलनेत यकृताचे आजार होण्याची संभावना जास्त असते.
फुफ्फुसांचे आजार : मद्यपानाबरोबर अनेक पुरुषांना महिलांपेक्षा अधिक धूम्रपान करण्याची सवय असते. या वाईट सवयीमुळं पुरुषांना फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता वाढते. पुरुषांना नेहमी धूळ आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो.
पुरुष असो की महिला प्रत्येकांनी आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं.