Red Section Separator

अनेकदा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा गार पाणी प्यायल्यामुळे आपला घसादुखतो. यात काहींच्या टॉन्सिल्सला सूजदेखील येते. तसेच यामुळे घश्यात खवखव देखील होते.

Cream Section Separator

तरी समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. या घरगुती उपायांचा अवलंब केल्यावर तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

गुळण्या करणं हा सर्वोत्तम मार्ग समजला जातो. कोमट पाण्यात अर्धात चमचा मीठ टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे कफ पातळ होतो.

चहामध्ये लवंग, तुळशीची पानं, हळद मिक्स करुन तो प्या.

तेलकट, मसालेदार पदार्थांपासून दूर रहा. त्यामुळे घशात जास्त जळजळ होऊ शकते.

पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.

या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण १चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून एक कप कोमट पाणी देखील पिऊ शकता. हे मिश्रण आपण दिवसातून २ ते ३वेळा घेऊ शकता.

Red Section Separator

घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री झोपतांना हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात.

Red Section Separator

घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळुन घ्यावा आणि 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्यावे.