Red Section Separator

आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन आढळते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पसरवण्याचे काम करते, शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होऊ शकतो.

Cream Section Separator

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा, डोकेदुखी, धाप लागणे, फुगणे यांसारखी लक्षणे जाणवतात.

आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरता दूर करणाऱ्या सुपरफूड्सविषयी सांगणार आहोत.

व्हिटॅमिन-सीने समृद्ध आवळा हिमोग्लोबिनच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करतो, आपण चटणी, रस किंवा मुरंबा या स्वरूपात नियमितपणे सेवन करू शकता.

हिरव्या पालेभाज्यांमुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते, त्यामुळे तुम्ही पालक सलाड किंवा भाजी म्हणून खाऊ शकता.

गुळामध्ये लोह आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, दोन चिमूटभर हळद पावडर गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

सफरचंद खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासोबत हिमोग्लोबिनची पातळी वाढते, त्यामुळे तुम्ही रोज किमान एक सफरचंद खावे.