Red Section Separator

शारीरिक संबंध ठेवल्याने आपत्य जन्माला येते. मात्र गर्भधारणेसाठी पुरुषाच्या शुक्राणूंना खूप महत्त्व असते.

Cream Section Separator

मात्र आजकाल पुरुषांना उद्भवणाऱ्या लैंगिक समस्यांमुळे मूल होण्यात अडचणी येतात.

पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंच्या कमतरतेमुळे महिला जोडीदार गर्भवती होण्याची शक्यता कमी होते.

जर एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये १५ दशलक्ष शुक्राणू प्रति मिलीलीटरपेक्षा कमी असतील, तर ही संख्या सामान्यपेक्षा कमी मानली जाते.

तरुणांमधील शुक्राणूंसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे शरीरात चरबीचं प्रमाण अधिक ही देखील प्रमुख कारणं आहेत.

टेस्टोस्टेरॉनमुळे शुक्राणूंचे उत्पादन वाढवते परंतु लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

Red Section Separator

म्हणूनच अधिक वजन असणाऱ्यांनी वजनावर नियंत्रण मिळवल्यास त्यांना शुक्राणूंसंदर्भातील समस्या होण्याची शक्यता कमी असते.

Red Section Separator

धुम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे सिगारेट ओढणाऱ्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Red Section Separator

धुम्रपानामुळे वीर्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या निष्क्रिय शुक्राणूंची संख्या वाढू लागते.

Red Section Separator

म्हणूनच पुरुषांनी धूम्रपानापासून दूर राहावे. गरोदर स्त्रियांसाठीही धुम्रपान फार धोकादायक असते.