Red Section Separator
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन निक कॅनन लवकरच त्याच्या 9व्या मुलाचे स्वागत करणार आहे.
Cream Section Separator
निक कॅननची माजी मैत्रीण आणि मॉडेल ब्रिटनी बेल त्यांच्या नवव्या मुलासह गर्भवती आहे. बेलचे हे तिसरे अपत्य आहे.
निक आणि ब्रिटनी यांना दोन मुले, एक 5 वर्षांचा मुलगा आणि 19 महिन्यांची मुलगी आहे. दोघेही त्यांच्या तिसर्या मुलासाठी उत्साहित आहेत.
जुलै महिन्यातच निक कॅननच्या 8व्या मुलाचा जन्म झाला. या मुलाचा जन्म त्याला मॉडेल ब्रे टायसीपासून झाला.
त्याच वेळी, निक कॅननला डीजे एबी डे ला रोसासह दोन जुळी मुले आहेत. या 13 महिन्यांच्या बाळांची नावं Zion आणि Zillion अशी आहेत.
प्रसिद्ध गायिका मारिया कॅरी ही निक कॅननची माजी पत्नी आहे. दोघांना दोन जुळी मुले आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
निक कॅननला गायिका अलिसा स्कॉटसोबत मुलगा झाला. जन्मानंतर अवघ्या 5 महिन्यांतच या मुलाचा कर्करोगाने मृत्यू झाला.
निकने एका मुलाखतीत सांगितले होते की, पिता बनल्यानंतर तो खूश आहे. त्याला त्याच्या सर्व मुलांवर प्रेम आहे.