Red Section Separator

नवीन कार खरेदीच्या विचारात जर तुम्ही असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहे.

Cream Section Separator

वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ह्युंदाई मोटर्स या महिन्यात आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्हीची फेसलिफ्ट सिरीज लाँच करणार आहे.

ह्युंदाई व्हेन्यू 16 जून रोजी लाँच होणार आहे. या कारचे बुकिंग अवघ्या 21,000 रुपयांपासून सुरू करण्यात आले आहे.

या कारमध्ये अलेक्सा, गुगल व्हॉईस कंट्रोल असणार आहे. नवीन ह्युंदाई व्हेन्यू 2022 मध्ये अलेक्सा आणि गुगल व्हाईस असिस्टंट हे फीचर्सदेखील देण्यात आले आहे.

ह्युंदाईच्या या कारमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार पेट्रोल किंवा डिझेल इंजिनचा पर्याय निवडता येणार आहे.

कंपनीची ही कार 3 इंजिन पर्यायांमध्ये लाँच होणार आहे. हे 6 ट्रिमसह उपलब्ध होणार आहे.

या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही मिळू शकतो.

Red Section Separator

ह्युंदाई व्हेन्यूची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

Red Section Separator

व्हेन्यूमध्ये सेफ्टीची काळजी घेण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग असतील.

Red Section Separator

यासोबतच व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स देखील असतील.

Red Section Separator

 व्हेन्यू बाजारात मारुती विटारा ब्रेझा फेसलिफ्ट, किया सोनेट, महिंद्रा XUV 300 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते.