Red Section Separator

जेव्हा तुमचा फोन हरवतो तेव्हा आपण फक्त त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो.

Cream Section Separator

परंतु, या सगळ्या दरम्यान आपण आपल्या मोबाइलमधील डेटाचे संरक्षण करण्यास विसरतो.

जी एक मोठी चूक ठरु शकते. कारण, तुमच्या डेटाचा गैरवापर केला जाऊ शकतो.

फोन चोरीला गेल्यावर आधी फोनचे सिम ब्लॉक करावं आणि नंतर त्यामधील डेटा डिलीट करावा.

CEIR ही दूरसंचार विभागाची अधिकृत वेबसाइट आहे.

मोबाइल चोरी रोखण्यासाठी आणि लोकांचे हरवलेले फोन ब्लॉक आणि अनब्लॉक करण्यासाठी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.

यासाठी तुम्हाला www.ceir.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो.

तथापि, यासाठी तुम्हाला एफआयआर दाखल करावी लागेल , फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचे काम होईल.