Red Section Separator
असंख्य प्रेक्षकांच्या आवडता खेळ IPL मधील अंतिम सामना नुकताच पार पडला असून यामध्ये गुजरात संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे
Cream Section Separator
आयपीएल 2022 स्पर्धेचा अंतिम सामना सात विकेट्सनी जिंकत गुजरातनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला मात दिल्यामुळे 14 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचं राजस्थानचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवल्य़ा गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने फलंदाजी घेतली.
त्यांनी 20 षटकात 9 गडी गमावत 130 धावाच केल्या. ज्या 18.1 षटकातच गुजरातने पूर्ण करत सामन्यासह स्पर्धाही जिंकली.
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली.
आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता.
Red Section Separator
आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.