९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींची नाव घ्यायचं म्हटलं तर अभिनेत्री काजोलचे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'बाजीगर', 'गुप्त', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', हे काजोलचे काही सुपरहिट चित्रपट.
एकेकाळी काजोलच्या प्रेमात हजारो चाहते होते. पण काजोल सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या प्रेमात पडली आणि तिने त्यात्याशी लग्नगाठ बांधली.
अजय आणि काजोलचे लव्ह मॅरेज होते. पण तुम्हाला माहितेय का अजय हे काजोलचे पहिले प्रेम नाही आहे.
काजलला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अजय नव्हे दुसराच एक अभिनेता आवडत असे.
अभिनेत्रीचा सर्वात जवळचा मित्र आणि बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने याबाबत गौप्यस्फोट केला होता.
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमादरम्यान करण जोहरने याबाबत खुलासा केला होता.
करण जोहरने सांगितले होते की, हिना चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अभिनेत्री काजोल तिचा 'क्रश' अक्षय कुमारला शोधत होती.
या चॅट शोमध्ये करणने आणखी एक गौप्यस्फोट केला होता. त्याच्या मते पहिल्या भेटीत काजोलला अजय देवगणही आवडत नव्हता. काजोलनेही करणच्या या वक्तव्याला होकार दिला होता.