बॉक्स ऑफिसवर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटासोबत कमल हासन यांचा 'विक्रम' आणि अदिवी शेषचा 'मेजर' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या तीनही सिनेमांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र कमाईच्या बाबतीत विक्रमने चांगलाच विक्रम केला आहे.
विक्रम या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांतच जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे.
विशेष बाब म्हणजे या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता.
'विक्रम' सिनेमाच्या माध्यमातून कमल हासनने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सिनेमाची निर्मिती लोकेश कनगराज यांनी केली आहे.
या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 34 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
तर ‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्या दिवशी 11 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आणि 12.50 कोटींचा टप्पा गाठला.
विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसत आहेत.