Red Section Separator

बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा बहुचर्चित ‘धाकड’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला.

Cream Section Separator

एकीकडे नुकताच रिलीज झालेला ‘भूल भुलैया 2’ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.

दुसरीकडे कंगनाचा ‘धाकड’ मात्र फ्लॉप ठरला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी धाकडने देशभरात फक्त 20 तिकिटे विकली आहेत.

गेल्या आठवड्यात 20 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

धाकड फ्लॉप झाल्यानंतर, थिएटरमध्ये त्याची जागा भुल भुलैया 2 ने घेतली आहे.

कंगनाच्या धाकडचे ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्स विकत घ्यायला कोणी तयार नाही.

धाकडबद्दल बोलायचे तर या चित्रपटात कंगनासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

Red Section Separator

सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर 3 कोटींचाही व्यवसाय करू शकलेला नाही.

Red Section Separator

धाकड 2100 स्क्रीन्समध्ये रिलीज झाला होता पण फ्लॉप झाल्यानंतर तो 250-300 स्क्रीन्सवर आला आहे.