Red Section Separator

बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करिना कपूर लवकरच OTT प्फ्लॅटफॉर्मवर झळकणार आहे.

Cream Section Separator

करिना कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत झळकणार आहे.

या सिनेमानंतर तिने स्वतःच्या ओटीटी पदार्पणाची तयारी सुरू केली आहे.

सुजॉय घोष यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मध्ये ती काम करत आहे.

कलिम्पोंग येथे या चित्रपटाच्या काही हिस्स्याचे चित्रिकरण पार पडले आहे. या सेटवरील काही छायाचित्रे तिने शेअर केली आहेत.

या चित्रपटात करिनासोबत अभिनेता जयदीप अहलावत देखील दिसून येणार आहे.

चित्रपटाची कहाणी जपानी लेखक कीगो हिगाशिनो यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

Red Section Separator

या चित्रपटाच्या कथेत हत्या, गूढ, रोमांच आणि बरेच काही आहे. या चित्रपटासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.

Red Section Separator

हा चित्रपट माझ्यासाठी ओटीटी पदार्पणाचा असणार असल्याचे करिनाने म्हटले आहे.