Red Section Separator

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. यामुळे शरीरात किडनी खूप महत्वाची असते.

Cream Section Separator

म्हणून किडनी खराब होऊ नये यासाठी आपण खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक.

‎लघवीला झाल्यास त्वरित लघवीस जावे. लघवीला होऊनही लघवी थांबवुन ठेवल्याने मुत्राशय, किडनीवर प्रचंड ताण येतो.

‎किडनीचा आजार टाळण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचे आहे.

‎पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. कुळथीचे कढण प्या, शहाळाचे पाणी प्या.

‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. दररोज 4 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका.

‎सेंद्रिय शेतीतून पिकलेला भाजीपाला खाण्यास प्राधान्य द्या. कोबी, फ्लॉवर खाणे टाळा.