Red Section Separator
ढगाळ वातावरण, पावसाची उघडझाप आणि चुकीच्या व्यवस्थापनामुळे कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे.
Cream Section Separator
यांत्रिक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं ? जाणून घ्या padhat
रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेली कापसाचे गळालेली पाते आणि बोंडे जमा करून नष्ट करावीत.
पिठ्या ढेकणाचे व्यवस्थापन करताना फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहित काढून नष्ट करावा.
पिवळ्या रंगाला पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात. म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत.
गुलाबी बोंड आळीग्रस्त डोमकळ्या दिसल्यास आतील अळीसहित त्या नष्ट कराव्यात.
हेक्टरी चार ते पाच कामगंध सापळे लावावेत.
कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपून खातील.