Red Section Separator
मुलांचे संगोपन करणे हे पालकांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही. त्यांची छोटीशी चूक मुलाच्या आयुष्यावर परिणाम करू शकते.
Cream Section Separator
बौद्ध धर्मातील काही गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर मुलांचे संगोपन करण्यास बरीच मदत करू शकतात.
आई-वडील जे काही बोलतात त्याचा थेट परिणाम मुलांवर होतो. अशा परिस्थितीत पालकांनी आपले शब्द अत्यंत काळजीपूर्वक निवडले पाहिजेत.
मुलांना तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता हे सांगणे पुरेसे नाही. त्यांच्याबद्दल नेहमी तुमचे प्रेम व्यक्त करा
बौद्ध धर्मानुसार, तुम्ही मुलांना फक्त तीच वचने द्यावी जी तुम्ही पूर्ण करू शकता.
पालकांनी नकळतही मुलांची चेष्टा करू नये. अशा कृत्यामुळे मुलांचे मन दुखावू शकतं
मुलांनी स्वतःचा आदर करावा अशी अपेक्षा करू नका. उलट त्यांच्या विचारांचा आणि भावनांचा तुम्ही आदर करा.
आत्मविश्वासाने आपण आपले ध्येय सहज साध्य करू शकतो. त्यामुळे स्वतःचा आणि मुलांचाही आत्मविश्वास वाढवा.
पालकांनी आपलं मन शांत आणि स्थिर ठेवावं. कोणत्याही कामाला चांगली दिशा देण्यासाठी पालकांमध्ये हे गुण असले पाहिजेत.