Red Section Separator

निरोगी शरीरासाठी डॉक्टर दररोज अंडी खाण्याचा सल्ला देतात.

Cream Section Separator

अनेकजण अंडी उकडून खातात. अंडी उकडताना आपण पाणी घेतो आणि अंडी उकडून झाल्यानंतर ते पाणी सहज फेकून देतो.

मात्र, हे अंड्याचे पाणी भरपूर फायदेशीर आहे. कसे ते आज आपण जाणून घेऊ

अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियमचे प्रमाण पुरेसे असते.

अंडे उकळल्याने हे घटक पाण्यात मिसळतात व हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत.

वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते.

उकडलेल्या अंडी किंवा अंड्याच्या कवचाचे पाणी वनस्पतींसाठी खत म्हणून काम करते.

पाण्यात अंडी उकळल्यानंतर अंड्यातील काही पोषक तत्त्वे येतात, जे झाडांसाठी खत म्हणून काम करतात.

टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे अशी झाडे खराब होणार नाहीत.