Red Section Separator

यंदा महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होऊ शकतो.

Cream Section Separator

येत्या चार ते पाच दिवसांमध्येही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Red Section Separator

दरम्यान, बुधवारी सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

तर गुरूवारी लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Red Section Separator

केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतरच महाराष्ट्रात मान्सूनची नेमकी तारीख सांगता येईल.

यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात २२ दिवस असे असणार आहेत, ज्यावेळी समुद्राला मोठी भरती येईल.

त्यामुळे यादरम्यान जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबई तुंबणार अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

Red Section Separator

त्यामुळे मुंबईकरांसाठी हे 22 दिवस धोक्याचे असणार आहेत.