Red Section Separator
वाहन क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असलेली मारुती सुझुकी कंपनीने बाजारात प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो गाडी लाँच केली आहे.
Cream Section Separator
या गाडीची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 6.49 लाख रुपये इतकी असून टॉप मॉडेलची किंमत 9.71 लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुतीची बलेनो प्रीमियम हॅचबॅक सर्व करांसह ऑनरोड 7.35 लाख ते 10.88 लाखांपर्यंत जाते.
यासाठी ग्राहकांना 70 हजार रुपयांचं डाउन पेमेंट करावं लागेल.
या डाउन पेमेंटसह पाच वर्षांसाठी 9.8 टक्के व्याज दर आहे. या गाडीसाठी प्रत्येक महिन्याला 14,055 रुपये भरावे लागतील.
मारुति सुझुकी 6 एअरबॅगसह 360-डिग्री कॅमेरा आणि 20 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते.
कारच्या मागील बाजूस एसी व्हेंट देण्यात आले आहेत, यापूर्वी ही सुविधा कारमध्ये नव्हती.
कारसोबत 1.2-लीटर आधुनिक के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले असून पूर्वीपेक्षा खूपच चांगले आहे.
आरामदायी प्रवासासाठी कारला नवीन सस्पेंशन देण्यात आले आहे. हे इंजिन सहसा 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायाने 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
भारतीय बाजारपेठेत, 2022 बलेनोची थेट स्पर्धा Hyundai i20, TATA Altroz आणि Honda Jazz शी आहे.