Red Section Separator

आई कुठे काय करते या मालिकेत आता अजून एक पात्र पाहायला मिळणार आहे.

Cream Section Separator

बिग बॉस फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथची या मालिकेत एन्ट्री होणार आहे.

मीरा जगन्नाथ ही यापूर्वी येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेत मोमो या भूमिकेत दिसली होती.

मोमोची भूमिका काहीशी विनोदी, वेंधळी अशी होती. मीराने या छोट्या भूमिकेतही आपल्या अभिनयाने जान आणली.

त्यानंतर मीराची वर्णी लागली ती बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये.

या शोमध्ये ती विजेती झाली नसली तरी तिने लक्ष वेधून घेतले.

मीरा याआधी एका वादग्रस्त विषयामुळे चर्चेत आली होती. मी टू मोहिमे अंतर्गत मीरानेही तिचा कास्टिंग काउचचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता.

अभिनयासोबत पाककृती करण्याची आवड असलेली मीरा उत्तम डान्सरही आहे.

बऱ्याच दिवसांनी मीरा पुन्हा छोट्या पडद्यावर येत असल्याने तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.