सोमवार म्हणजेच 30 मे या दिवशी सोमवती अमावस्या, ज्येष्ठ अमावस्या आणि शनी जयंती हे महत्त्वाचे व्रत आहे.
अशा स्थितीत या दोन्ही व्रतांचा शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देत आहोत.
सोमवती अमावस्या ; या व्रताचे पालन केल्याने पित्तरं प्रसन्न होतात आणि त्यांना शांती लाभते. येत्या 30 मे रोजी अमावास्या सोमवारी आहे. त्यामुळे तिला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते.
आपण जाणून घेऊया सोमवती अमावस्या शुभ मुहूर्त काय असणार आहे?
सोमवती अमावस्या तिथी – 30 मे 2022 (सोमवार) अमावस्या तिथी समाप्ती – 30 मे 2022 सायंकाळी 04:59 वाजता.
शनी जयंती : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. यंदा 30 मे रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे.
या दिवशी शनी देवांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते. जाणून घेऊया शनी जयंतीचे शुभ मुहूर्त.
शनी जयंती प्रारंभ तिथी – 29 मे 2022 दुपारी 2:54 वाजता शनी जयंती समाप्ती तिथी – 30 मे 2022 सायंकाळी 4:59 वाजता