Red Section Separator

पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती पाहता देशातील नागरिक आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत.

Cream Section Separator

विशेष बाब म्हणजे सरकार देखील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

यातच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे.

या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ होणार आहे.

'शिवाई'ची वैशिष्ट्ये : बसची लांबी 12 मीटर, टू बाय टू आसन व्यवस्था, एकूण 43 आसने, ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी, गाडी ताशी 80 किमी वेगाने धावणार, बॅटरी क्षमता 322 के.व्ही.

राज्य परिवहन महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस १ जून रोजी पुण्याहून अहमदनगरला रवाना होईल.

Red Section Separator

राज्यात 'शिवाई'या नावाने इलेक्ट्रिक बसेस धावतील. राज्याच्या विविध भागात या इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील.

Red Section Separator

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय  महामंडळाने घेतला