Red Section Separator
चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे आज ओळखले जाते.
Cream Section Separator
त्यांना दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. परंतु नागराज मंजुळेंची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती.
नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला.
नागराज मंजुळे यांना अभ्यासात विशेष रस नव्हता. पण, त्यांना बालपणापासूनच चित्रपटांची ओढ होती.
बऱ्याच वेळा ते शाळेचे दप्तर लपवून मित्रांसोबत चित्रपट पाहायला जायचे.
मंजुळे यांनी पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि एम.फील देखील पूर्ण केले. दरम्यान, त्यांनी मास कम्युनिकेशनच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला.
चित्रपट निर्मिती हे त्यांचे स्वप्न असल्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार आला. यासाठी त्यांना पैशांची कमतरता होती.
पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांनी रात्रीचे सुरक्षारक्षक म्हणून काम केलं तर दिवसभर ते लोकांचे कपडे इस्त्री देखील करून देत होते.
नागराज मंजुळे यांना ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
‘फँड्री’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार मिळाले. ‘सैराट’ चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.