कोरोनाकाळात थिएटर बंद असल्याने प्रेक्षकांसाठी OTT हा बेस्ट पर्याय ठरला आहे.
थिएटर सुरु झाले असले तरी देखील आजही OTT ची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.
यातच आजकाल बिग बजेट तसेच हिट सिनेमे OTT वर रिलीज होऊ लागले आहे.
नुकताच अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा सम्राट पृथ्वीराज हा देखील OTT वर झळकणार आहे.
विशेष बाब म्हणजे सम्राट पृथ्वीराज या सिनेमासह आणखी काही सिनेमे हे लवकरच OTT वर झळकणार आहे.
अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाचे डिजिटल हक्क अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला देण्यात आले आहेत.
त्याच्या OTT रिलीझबद्दल बोलायचे झाले तर ते 29 जुलै किंवा त्यानंतर कधीही रिलीज होऊ शकते.
आदिवी शेष दिग्दर्शित 'मेजर'सिनेमाचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर 60 दिवसांनी हा चित्रपट OTT वर येईल.
कमल हसनचा विक्रम बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.यासोबतच त्यांचे चाहते OTT वर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
निर्मात्यांनी 'विक्रम' चित्रपटाचे सर्व भाषा अधिकार OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ला विकले आहेत. मात्र अद्याप त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.