Red Section Separator

पावसाळ्यात डासांचा त्रास खूप होत असतो. त्यामुळे लोक मेडिकलमधील विविध प्रोडक्ट्स वापरतात.

Cream Section Separator

बऱ्याचदा हे प्रोडक्ट्स आरोग्याच्या दृष्टीने नुकसानीचे ठरते, अशावेळी घरासमोर कोणती झाडं लावावी, ते पाहू...

घराच्या बाल्कनीत झेंडूच्या फुलाचे रोप लावावे. कारण, याच्या वासाने डास दूर पळतात.

गवती चहाचे रोप लावण्याने मूड फ्रेश ठेवतोच, त्याचबरोबर ते डासांना दूर ठेवते.

लेमन बामचं रोप शोभेसाठी लावले जाते. पण, याच्या वासाने डास घरात येत नाहीत.

लसणाचे रोपदेखील डासांना पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

लॅव्हेंडरचा वास डासांना सहन होत नाही, त्यामुळेच डासांच्या औषधात त्याचा वापर करतात.

रोजमेरी रोपाची ओळखच डासांना पळवून लावणारे रोप अशी आहे. त्याचे फूलदेखील सुंदर दिसतात.

घरात तुळस लावायलाच हवी. कारण, तुळस डास आणि किड्यांना पळवून लावते.