केंद्रातील मोदी सरकारला आज तब्बल 8 वर्षे पूर्ण झाली असून या आठ वर्षातील त्यांनी घेतलेले 8 मोठे निर्णय आज आपण पाहूत...
1. नोटबंदी-या सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाहेर काढल्या, नोटबंदी जाहीर केली.
2. जीएसटी-GST ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून ओळखले जाते. 1 जुलै 2017 मध्ये देशात GST लागू करण्यात आला.
3. सर्जिकल स्ट्राईक- 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैनिकांनी पाकाव्यक्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केले.
4. तीन तलाक-तीन तलाकच्या विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा पारित करण्यात आला.
5. कलम 370 आणि 35A – जम्मू -काश्मीरसाठी असलेले कलम 370 आणि अनुच्छेद 35A हे 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द केले.
6. CAA- CAA कायदा हा देशातील महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर 10 जानेवारी 2020 पासून देशात CAA लागू झाला आहे.
7. बोडो शांती करार- नक्षलवादी संघटनांशी चर्चा कारून शांती करार करण्यात आला. मोदी सरकारने जानेवारी 2020 ला हा निर्णय घेत करारावर स्वाक्षरी केली.
8. नॅशनल मेडिकल कमिशन बिल- 2018 मधे भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सरकारने MCI ला भंग करून त्याचे एक बोर्ड ऑफ गव्हर्नन्समध्ये बदल केला आहे.