Red Section Separator
साऊथ चित्रपट 'पुष्पा:द राईज' ने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं.
Cream Section Separator
या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडली होती.
विक्रमी गल्ला जमवत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
सिनेमात सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानासह फहद फासिल यांच्या मुख्य भूमिका होत्या.
आता चाहत्यांना या चित्रपटाच्या 'पुष्पा-द रुल' या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा'च्या सिक्वेलची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाल चंदनाच्या तस्करीवर बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला आणखी मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याचं ध्येय आखलं जात आहे.
या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक खुश आहेत.