Red Section Separator

शेती पूरक व्यवसायात कुक्कुटपालन व्यवसायाला एक वेगळेच महत्त्व दिले जाते.

Cream Section Separator

हा व्यवसाय कमी खर्चात देखील सुरु करता येत असल्याने अल्पभूधारक शेतकरी बांधव कुकूटपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

गावरान कोंबड्यांचे संगोपन करून शेतकरी बांधव शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्न कमवत आहेत.

देहलम रेड कोंबडी- या कोंबडीचे पालन केल्यास शेतकरी बांधवांना अल्पावधीतच चांगली कमाई होणार आहे. या जातीच्या कोंबड्या एका वर्षाला दोनशे ते अडीचशे अंडी देण्यास सक्षम असतात.

गिरीराज कोंबडी- गिरीराज कोंबडीची एक गावरान जात असून या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. या जातीची कोंबडी दोन महिन्यात एक किलो इतक्या वजनाची होत असते.

जातीची कोंबडी मांस उत्पादनासाठी फायदेशीर राहणार आहे. मात्र एका चक्रात या जातीची कोंबडी केवळ दीडशे अंडी देण्यास सक्षम असते.

वनराज- वनराज ही देशी कोंबड्यांची एक प्रगत जात आहे. या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो वजनाच्या होतात.

या जातीच्या कोंबड्या एका चक्रात 120 ते 160 अंडी देतात. यामुळे मांस उत्पादन करण्यासाठी या जातीच्या कोंबड्यांचे संगोपन करावे.

ब्लॅक अस्ट्रालॉर्प-  या जातीच्या कोंबडीचे तीन महिन्यात दोन किलो वजन बनत असते. एका चक्रात 160 ते 200 अंडी देण्यास ही जात सक्षम असते.