कमी किमतीत आकर्षक फीचर्स देणारी Redmi कंपनीचे फोन हे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.
यातच कंपनीच्या एका स्मार्टफोनने सध्या बाजारात विक्रीबाबत धुमाकूळ घातला आहे.
पहिल्याच सेलमध्ये Redmi Note 11T Pro स्मार्टफोनचे 2,70,000 युनिट्स फक्त एका तासात विकले गेले आहेत.
हा धमाकेदार प्रतिसाद चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्ये मिळाला आहे. लवकरच हा हँडसेट भारतात देखील येऊ शकतो.
Redmi Note 11T Pro फोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी आहे.
प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा डिमेन्सिटी 8100 चिपसेट मिळतो.
सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते.
सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा ISOCELL GW1 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
Redmi Note 11T Pro चा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 1699 युआन (जवळपास 19,800 रुपये) मध्ये लाँच झाला आहे.
8 जीबी रॅम व 128 जीबी मॉडेलची किंमत 1,999 युआन (जवळपास 23,300 रुपये) आहे.
8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 2099 युआन (जवळपास 24,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल.