Red Section Separator
लिंबातील सायट्रिक ऍसिड मृत त्वचा काढून टाकते असे मानले जाते. तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
Cream Section Separator
एक भाग साखर दोन भाग लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण खडबडीत भागावर हलक्या हाताने घासून 5 ते 7 मिनिटे तसेच ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.
तुमच्या पायावर काही जखम, ओरखडे किंवा जखमेचे फोड असल्यास लिंबू वापरणे टाळा.
यामध्ये असलेल्या नैसर्गिक ऍसिडमुळे जळजळ होते तसेच जखमेवर वाईट परिणाम होतो.
पाण्यात सेंधव मीठ विरघळवून त्यात आपले पाय ठेवून 20 मिनिटे बसा.
कोरडे आणि फाटलेले पाय एक्सफोलिएट करण्यासाठी फूट ब्रश वापरा.
हे तुमच्या पायाची मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते, त्वचा मऊ आणि निरोगी दिसते.
ओटमील आणि गुलाबजल समान प्रमाणात घ्या. ते मिक्स करून हे स्क्रब पायांना लावा.
20 ते 30 मिनिटे पायांना लावून ठेवा. तुमचे पाय एक्सफोलिएट करण्यासाठी फूट ब्रश वापरा.
पाय थंड पाण्याने धुवा आणि आपले पाय कोरडे होऊ द्या. त्यानंतर रिच मॉइश्चरायझर लावा.