Red Section Separator

'एकूलती एक' या सिनेमातून अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Cream Section Separator

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या जोडीवर गेली अनेक दशकं प्रेम केलं. त्यांची ही कन्या.

बॉलिवूड, मराठी इंडस्ट्री, ओटीटी, विदेशी भाषांमधील चित्रपट या सर्वांमध्येच श्रियानं तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

श्रिया सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे. तिने अलीकडेच पोस्ट केलेले काही फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.

या फोटोशूटमध्ये श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.

अभिनेत्रीने या लूकसाठी फ्लॉरल मोनोकिनी परिधान केली असून त्यावर सफेद शूजही घातले आहेत.

चाहत्यांप्रमाणेच सिनेसृष्टीतील विविध कलाकारांनी श्रियाच्या या लूकचे कौतुक केले आहे.

'मिर्झापूर', 'द गॉन गेम', 'गिल्टी माइंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'क्रॅकडाऊन' या तिच्या काही गाजलेल्या वेब सीरिजची नावं आहेत.

'हाऊस अरेस्ट', 'भांगरा पा ले' या सिनेमांमध्येही तिनं काम केलं आहे. तिने विविध प्रोजेक्ट्सच्या मेकिंगमध्येही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.